घरमहाराष्ट्रअमित शहांचा सांगली - कोल्हापूर दौरा रद्द

अमित शहांचा सांगली – कोल्हापूर दौरा रद्द

Subscribe

येत्या २४ जानेवारीला अमित शहांचा सांगली- कोल्हापूर दौरा होता. अमित शहा यांना स्वाईन फ्ल्यू झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहे. भाजपने देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा आणि सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा सांगली- कोल्हापूरचा दौरा करणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. येत्या २४ जानेवारीला अमित शहांचा सांगली- कोल्हापूर दौरा होता. अमित शहा यांना स्वाईन फ्ल्यू झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र उद्या अमित शहा यांची पश्चिम बंगालमध्ये भव्य सभा होणार आहे.

अमित शहांना मिळाला डिस्चार्ज

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. त्याच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. १६ जानेवारीला उपचारासाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून एम्स रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

स्वत: ट्विट करुन दिली होती माहिती

अमित शहा यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयाचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखित त्यांच्यावर उपचार सुरु होते. अमित शहा यांनी स्वत: आपल्याला स्वाईन फ्लू झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी यासंबंधी ट्विट केले होते आणि म्हटले होते की, ‘मला स्वाईन फ्ल्यू झाला आहे. माझ्यावर उपचार सुरु आहे. ईश्वराच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी मी लवकरच बरा होईल.’

पश्चिम बंगालमध्ये सभेवरुन वाद

अमित शहा यांची पश्चिम बंगालच्या मालदा येथे २२ जानेवारीला म्हणजे उद्या सभा होणार आहे. या सभेआधी पश्चिम बंगाल सरकार आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. अमित शहा यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा देण्यास पश्चिम बंगाल सरकारने नकार दिला होता. वाद वाढत चालल्यानंतर सरकारने हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा दिली. मात्र आता सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -