घरताज्या घडामोडीबिग बींची प्रकृती स्थिर; रुग्णालयाची माहिती

बिग बींची प्रकृती स्थिर; रुग्णालयाची माहिती

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे आता बिग बींची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, असल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. शनिवारी रात्री बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या बातमीने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

‘अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे’, असे नानावटी रुग्णालयाकडून माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

RTPCR टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची आरटी पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असते. त्यामुळे सध्या अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी दुसरी म्हणजे आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. परंतु, अद्याप त्याचे रिपोर्ट आलेले नाहीत. हे रिपोर्ट २४ तासांनंतर येतात. त्यामुळे सध्या सगळेच जण या रिपोर्टसची प्रतिक्षा करत आहेत.

बिग बींचा जलसा बंगला सील

अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील जलसा, जनक आणि प्रतीक्षा हे तिन्ही बंगले पालिकेकडून सॅनिटाईज केले जाणार असून जलसा बंगल्यावर एक टीम सध्या रवाना झाली आहे. तसेच जलसा बंगला आता पालिकेकडून सील करण्यात आला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Amitabh Video : अमिताभ बच्चन यांचा रुग्णालयातून व्हिडिओ संदेश!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -