घरमहाराष्ट्रअमोल कोल्हे प्रचाराच्या रिंगणात

अमोल कोल्हे प्रचाराच्या रिंगणात

Subscribe

शिवाजी आढळराव पाटलांचा कस लागणार

पिंपरी, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील अभिनेते अमोल कोल्हे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. त्यांचा पक्षातील प्रवेश आगामी शिरुर लोकसभा निवडणुकीत विजयाची नांदी ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुरमधून ते संभाव्य उमेदवार म्हणून दावेदार मानले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भोसरी गावजत्रा मैदानावर मंगळवारी (दि.5) सायंकाळी 6 वाजता अमोल कोल्हेच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.

तसेच या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या नियोजनासाठी भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक आज (रविवारी) घेण्यात आली. शिवसेनेचे पुर्वाश्रमीचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख असलेल्या अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला चांगलेच धक्कातंत्र मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरुर लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना मैदानात उतरविणार येणार आहे. याकरिता शिरुर लोकसभा मतदार संघातील भोसरी, चाकण, खेड, आंबेगाव, राजगूरुनगर, शिरुर आणि हडपसर मध्येराष्ट्रवादीच्या जाहीर सभा होणार आहेत.

- Advertisement -

शिरुर लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. या बालेकिल्ल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने भगदाड पाडण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजी आढळराव-पाटील यांच्या विरोधात अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उतरविणार असल्याने आढळराव पाटलांचा शिरुरच्या मैदानात चांगलाच कस लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -