घरमहाराष्ट्रधुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांचा एकतर्फी विजय

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांचा एकतर्फी विजय

Subscribe

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार अभिजीत पाटील यांना पराभूत केले. अमरीश पटेल यांना ३३२ मते तर अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. अमरीश पटेल यांना मिळणार केवळ वर्षभर आमदारकी मिळणार आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार लढाई होती. दोन्ही बाजुंनी ताकद पणाला लावली होती. मात्र, या लढाईत भाजपने बाजी मारली आहे.

भाजपचे विजयी आमदार अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश आले आहे. भाजपने १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ जणांनी मतदान केले होते. काँग्रेसचे १५७ एवढे संख्याबळ असतानाही अभिजीत पाटील यांना ९८ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या किमान ५७ मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले आहे. तर आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्राँस व्होटिंग केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची २१३ मते असतानाही पाटील यांना ९८ मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा ३० सप्टेंबर २०१९ ला राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी १४ डिसेंबर २०२१ या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. १ एप्रिलला होणारी पोटनिवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या काळात धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान झाले. या निवडणुकीची निकाल आज ३ डिसेंबरला लागला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -