अमृता फडणवीस यांची लहानपणापासूनची ‘ही’ इच्छा झाली पूर्ण

Pimpri Chinchwad
Amruta Fadnavis
अमृता फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची आज बैलगाडीत बसण्याची हौस पूर्ण झाली असून लहान पणापासूनची इच्छा आज पूर्ण झाली असल्याचे त्या म्हणाल्या. पिंपरी-चिंचवड मधील इंद्रायणी थडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. भोसरी मध्ये आयोजित इंद्रायणी थडीत आज अमृता फडणवीस आल्या होत्या, तेव्हा मुख्य कार्यक्रमाच्या अंतरापासून त्यांना बैलगाडीत बसवून घेऊन जाण्यात आले. यावेळी त्यांनी काही क्षण बैलगाडीची सारथ्य केले.

आपल्या भाषणात अमृता फडणवीस यांनी त्या क्षणांचा आवर्जून उल्लेख करत बैलगाडीतून प्रवास करण्याची लहान पणापासूनची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली असून पुढील वेळेस शेतात बैलगाडीत बसण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Amruta Fadnavis at Indrayani Thadi
अमृता फडणवीस यांनी बैलगाडीत बसण्याचा आनंद घेतला.

पुढे त्या म्हणाल्या की, आज लोकांचा विचार करणारे खूप कमी नेते आहेत. स्त्रियांनी गुणवत्ता दाखवणे खूप गरजेचे आहे. आपल्या आवडीनुसार जगायला हवे. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. तरच भारत पुन्हा सोन्याची चिमणी असणारा देश बनेल, असे देखील त्या म्हणाल्या.