घरताज्या घडामोडीवाह प्रशासन म्हणत मिसेस फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

वाह प्रशासन म्हणत मिसेस फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

Subscribe

राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन मिसेस फडणवीस अर्थात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. बार आणि दारुची दुकानं उघडली, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये का?, असा सवाल अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केला आहे. तसंच वाह प्रशासन म्हणतं अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. असमर्थ ठरल्यानंतर प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीचं गरजेचं असतं, असं देखील त्या म्हणाल्या.

शिवसेनेचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राज्यपालांच्या प्रमाणपत्राची गरजं नाही, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल्यांच्या पत्राला दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

‘वाह प्रशासन! बार आणि दारुची दुकानं उघडी आहेत, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? नियमावली लागू करण्यास असमर्थ ठरलेल्या काही पाळीव प्राण्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राची गरजं लागते.’

दरम्यान काल राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केलं. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजपने गणपतीच्या मूर्तीची आरती केली. तसेच मंदिरात जाण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडवलं. इतकंच नाही तर यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं. ज्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरित उत्तरही दिलं.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रयुद्ध!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -