घरCORONA UPDATEस्थलांतरितांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली!

स्थलांतरितांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली!

Subscribe

सध्या ४० हजाराहून अधिक रूग्ण सध्या मुंबईत आहेत. तर राज्यात ७८ हजारांच्यावर कोरोनाचा आकडा गेला आहे.

देशात कोरोनाच संकट आलं आणि लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर लॉकडाऊनची घोषणा होताच हातावर पोट असणाऱ्या मजुरांनी गावचा रस्ता पकडला. त्यानंतर सरकारनेच राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी दिली. मात्र पुरेशी काळजी घेतली न गेल्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव आणखी वाढला. कोरोनाचा प्रादुर्भाव आता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसू लागला आहे.

सध्या ४० हजाराहून अधिक रूग्ण सध्या मुंबईत आहेत. तर राज्यात ७८ हजारांच्यावर कोरोनाचा आकडा गेला आहे.  गेल्या दहा दिवसात मोठ्याप्रमाणात राज्यातील स्थलांतरित मजूर व अन्य कष्टकरी वर्गाने मुंबई- पुण्यातून आपल्या गावची वाट धरली. मिळेल त्या वाहनातून जमेल तसा प्रवास करत गावचं घर गाठल. यामुळे या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे.

- Advertisement -

गेले अनेक दिवस मुंबईतून अन्य राज्यात लक्षावधी परप्रांतीय आपल्या गावी गेले. आणि याच कालावधीत किंवा त्याच्या थोडे आधी मुंबई-पुण्यात अडकून पडलेल्या अन्य जिल्ह्यातील हजारो लोकांनी आपल्या गावची वाट धरली होती. परिणामी करोना रूग्णांची संख्या आता दुपटीने वाढली आहे. राज्यातील चौदा जिल्ह्यात जेथे कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता अथवा तुरळक रुग्ण होते तेथे स्थलांतरितांमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

मुंबई- पुण्यातून मोठ्या संख्येने लोक ठाणे जिल्हा, रायगड, पुणे जिल्हा, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला व अमरावतीला गेले आहेत. या बहुतेक ठिकाणी मागील तीन दिवसातील कोरोना रुग्णांच्या सरकारी आकडेवारीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. २८ मे ते १ जून या कालावधीत ठाणे जिल्ह्यात दीड हजाराने रुग्णसंख्या वाढली तर रायगडमध्ये २०० हून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील नऊ जिल्ह्यात साधारणपणे गेल्या चार दिवसात सत्तर ते दोनशे रुग्ण आढळून आले असून यातील बहुतेक हे स्थलांतरित असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या म्हणण्यानुसार “रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, पुणे ग्रामीण, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. मात्र राज्यातील स्थलांतराच्या प्रश्नावर यापूर्वी सखल चर्चा झाली असून जिल्हानिहाय क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणाऱ्या बहुतेक स्थलांतरितांना चौदा दिवस विलगीकरणाखाली ठेवण्यात आले आहे.  तर पाच लाख ६७ हजार लोकांना घरीच क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे.


हे ही वाचा – एसटी महामंडळाचा अजब कारभार; अधिकार नसलेल्या व्यक्तीने काढलं परिपत्रक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -