घरमहाराष्ट्रराज्‍याच्‍या आर्थिक परिस्‍थितीचा आढावा सुरु - उद्धव ठाकरे

राज्‍याच्‍या आर्थिक परिस्‍थितीचा आढावा सुरु – उद्धव ठाकरे

Subscribe

श्‍वेतपत्रिकेचे दिले संकेत , आरे प्रकरणी दाखल केलेले गुन्‍हे मागे

राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे. माहिती मागवली आहे. आज काही माहिती आली, अजून माहिती येत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. आरेतील कारशेडसाठी झाडांची कत्तल झाल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दरम्यान विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर पासून नागपूरला होणार आहे.

रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक संपल्यावर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यावर सव्वापाच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे पैसे कुठे आणि कसे वापरले, किती योजना पूर्ण झाल्या, किती रखडल्या आहेत, याचा आढावा घेण्याचे काम नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केले आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम आता सुरू झाले आहे. माहिती मागवली आहे. आज काही माहिती आली. अजून माहिती येत आहे. त्याचा एकंदरीत आढावा मी घेणार आहे.

- Advertisement -

मुंबईतील मेट्रोला मी स्थगिती दिलेली नाही. पण आरमधील कारशेडला मात्र स्थगिती देण्यात आली, याचा पुनरुच्चार करून उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आरेमधील मेट्रोच्या कारशेडसाठी काही झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. त्या पर्यावरणप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याचे आदेश मी आज दिले आहेत. या पर्यावरणप्रेमींची भविष्यातही आम्हाला गरज भसणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होईल. आता आम्ही सात मंत्री आहोत आणि एकदिलाने काम करत आहोत. त्यामुळे मंत्रीपदाच्या वाटपावरून आमच्यात काही वितुष्टता आहे, असे नाही. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार जाहीर करण्यात येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -