घरमहाराष्ट्रअंदुरे, कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या

अंदुरे, कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या

Subscribe

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला आहे. यापुढील कार्यवाही म्हणून त्यांनी काल, बुधवारी विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक विरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

तावडेच्या सोबतीने हत्येचा कट रचला

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी बंगळुरु येथील पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने, दाभोलकर यांचेवर गोळ्या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अंदुरे यास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला होता. डॉ. विरेंद्रसिंग तावडे यांच्यासोबतीने इतर आरोपींनी डॉ. दाभोलकर यांचे हत्येचा कट रचल्याचे आरोपपत्र म्हटले आहे.

- Advertisement -

दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर मारले 

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी मोटारसायकलवरुन आलेले दोन हल्लेखोर अंदुरे आणि कळसकरच होते, असे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. सीबीआयच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या दाव्यात हल्लेखोर शरद कळसकर याच्या चौकशीतून समोर आलेली बाब म्हणजे, २०ऑगस्ट २०१३ रोजी ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वासात वाजण्यापूर्वी त्याठिकाणी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर नेमके कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचे उघडकीस आले. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -