घरमहाराष्ट्रपंतप्रधानांना मनीऑर्डर पाठवणाऱ्या शेतकऱ्यांची घेतली दखल

पंतप्रधानांना मनीऑर्डर पाठवणाऱ्या शेतकऱ्यांची घेतली दखल

Subscribe

शेतकरी कांद्याच्या भावाबद्दल अग्रेसर असताना त्यांनी कांदा विक्रीसाठी येणारा खर्च देखील शेतकऱ्यांनी सांगितला आहे.

कांद्याला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी आधीच संतप्त आहे. नाशिक जिल्ह्यातील आणि निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्याने दीडशे रुपये प्रती क्विंटल भाव मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हा संताप व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च्या खिशातले ५३ रुपये खर्च करुन १हजार ६४ रुपयांची मनीऑर्डर पाठवली होती. मनीऑर्डर प्राप्त झाल्यानंतर कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

भाव इतका कमी की खर्चही निघत नाही

नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यासाठी केलेल्या खर्चा इतकेही पैसे त्यांना मिळाले नाहीत. कांद्याला १०० ते २०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठे अडचणीत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रभर आंदोलने देखील केले आहेत. कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरी देखील मोठा अडचणीत आला होता. यावर सरकार काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

- Advertisement -
वाचा- लासलगाव बाजार समितीत कांदा घसरला

बाजारात कांदा आणेपर्यंत होतो इतका खर्च

शेतकरी कांद्याच्या भावाबद्दल अग्रेसर असताना त्यांनी कांदा विक्रीसाठी येणारा खर्च देखील शेतकऱ्यांनी सांगितला आहे. शेतकरी साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार सात क्विंटल कांदा बाजारात विकून १५१ रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला. त्याचे १हजार ६४ रुपये आले. कांदा गाडीत भरण्यासाठी ४०० रुपये मजूरी लागली. गाडीभाडयाचा खर्च ७०० रुपये आला. १ हजार १०० रुपये निव्वळ कांदा मार्केटमध्ये नेण्याचा खर्च आला. हा इतका खर्च शेतकऱ्यांना येतो. त्या आधी देखील कांद्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले जाते. लावणी, निंदणी, फवारणी, कांदा फवारणी या सगळ्याचा हिशोब यात कधीच पकडला जात नाही. हेच लक्षात आणून देण्यासाठी पंतप्रधान मोदींना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मनीऑर्डर पाठवली.

वाचा- शेतकऱ्याची अजब गांधीगिरी; मोदींनाच पाठवले हजार रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -