घरCORONA UPDATE'करोनाची चाचणी करुन घे', सांगणे पडले महागात

‘करोनाची चाचणी करुन घे’, सांगणे पडले महागात

Subscribe

'करोनाची चाचणी करुन घे', असे सांगणाऱ्या पती आणि सासूला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पती – पत्नीमध्ये सातत्याने कोणत्याना कोणत्या कारणावरुन वाद होताना आपण पाहिले आहेत. मात्र, आता हा करोना व्हायरस एक वादाचा मुद्दा ठरला आहे. एकीकडे करोना व्हायरमुळे देश हैराण झाला असताना दुसरीकडे मात्र, करोना व्हायरसमुळे नवरा बायकोमध्ये वाद होताना दिसत आहे. दरम्यान, पत्नीला करोनाची चाचणी करुन घे असे सांगणाऱ्या पत्तीला आणि सासूला लोखंडी विळ्याने मारहाण केल्याची घटना बारामती शहरात घडली आहे.

नेमके काय घडले?

सध्या जगभर करोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे या करोनाचा अधिक प्रसार होऊ नये, म्हणून देश लॉकडाउन करण्याची घोषणा केली आहे. परंतु, पिंपरी येथून आलेल्या आपल्या पत्नीला तू करोनाची वैद्यकीय तपासणी करुन घे, असा सल्ला पतीन दिला. त्यामुळे पती – पत्नीत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आपल्या मुलाला सून मारत आहे. हे पाहून सासूने ‘कशाला वाद घालता,भांडू नका’, असे म्हटले. त्यामुळे रागात असलेल्या सूनेने आपला मोर्चा सासूकडे वळवला आणि रागाच्या भरात लोखंडी विळा उचलला आणि कशाचाही विचार न करता आपल्या सासूला आणि पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये पती आणि सासू जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार गाड्या दाखल; नागरिकांची तुफान गर्दी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -