घरमहाराष्ट्रलोकांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशीनने भाजपाला केलं - अनिल गोटे

लोकांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशीनने भाजपाला केलं – अनिल गोटे

Subscribe

लोकांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशीनने भाजपला मतदान केलं. त्याचबरोबर धुळ्याची निवडणूक म्हणजे आपल्या पापवर विजयाचे झाकण घालण्याचा प्रकार असून धुळ्यातल्या भाजपाच्या विजयाला पैशाचा केलेला वापर कारणीभूत असल्याचे अनिल गोटे म्हणाले आहेत.

धुळे महापालिकेमध्ये भाजपने ५० जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपमधून बाहेर पडलेले अनिल गोटे यांच्या जनसंग्राम पक्षाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. या निवडणूकीनंतर अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर या निवडणूक निकालावर गोटे यांनी शंका वर्तवली आहे. या निवडणूकीत इव्हीएम मशीन घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की, लोकांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशीनने भाजपला मतदान केलं. त्याचबरोबर धुळ्याची निवडणूक म्हणजे आपल्या पापवर विजयाचे झाकण घालण्याचा प्रकार असून धुळ्यातल्या भाजपाच्या विजयाला पैशाचा केलेला वापर कारणीभूत असल्याचे अनिल गोटे म्हणाले आहेत.

हेही वाचा – Live Result : धुळे महापालिकेत भाजपचेच ‘अच्छे दिन’

- Advertisement -

भाजप नव्हे तर विश्वासघाताचे यश – गोटे

अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावरव सडकून टीका केली आहे. ते म्हणतात की, धुळ्याबद्दल महाजनांना काहीही माहिती नाही, त्यामुळे त्यांना धुळ्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. महाजनांसारखा लबाड आणि खोटा माणूस जगात नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आपली फसवणूक केल्याचे गोटे म्हणाले. त्यामुळे हे भाजपाचे यश नसून विश्वासघाताचे यश असल्याचे अनिल गोटे म्हणाले आहेत.

भाजपच्या गुन्हेगारांचा विजय – गोटे

अनिल गोटे म्हणतात की, धुळ्याच्या विजयला ते लोक भाजपचा विजय झाला असे म्हणत असतील तर अटलबिहारी वाजपेयींचा हा भाजप आहे का? असा सवाल गोटे यांनी केला आहे. त्याचबरोबर पक्षात २०-२५ वर्षे काम करणाऱ्यांना उमेदवारी द्यायची आणि आयात लोकांना उमेदवारी द्यायची आणि यात स्वत: जिंकल्याचे म्हणता. त्यामुळे याद्वारे तुम्ही चुकीचे समर्थन करत असल्याचे गोटे म्हणाले आहेत. त्याचबरोबर भाजपातल्या गुन्हेगारांचा हा विजय असल्याचे गोटे म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – माझ्या जीवाला धोका; अनिल गोटेंचा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -