अनिल गोटेंचा लेटर बॉम्ब

देवेंद्रजी आपण धुळेकरांची का फसवणूक केलीत? ४७ महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये माझी काय चूक झाली ते दाखवा मी आजच राजीनामा देतो असं यामध्ये अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

Mumbai
Anil Gote

धुळ्यातील निवडणुकीमध्ये भाजप आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. नाराज अनिल गोटेंनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट एक पत्र लिहिलं आहे. या पत्राची एक प्रत माय महानगरच्या हाती लागली असून त्यामध्ये अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहे. शिवाय माझा गुन्हा काय? असा सवाल देखील अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

काय आहे पत्रात?

भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये काही सवाल उपस्थित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी धुळे महानगरपालिकेमध्ये केलेल्या बंडखोरीचा देखील उल्लेख केला आहे. या मत्रामध्ये अनिल गोटे म्हणतात की, देवेंद्रजी आपण धुळेकरांची का फसवणूक केलीत? ४७ महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये माझी काय चूक झाली ते दाखवा मी आजच राजीनामा देतो असं यामध्ये अनिल गोटे यांनी म्हटलं आहे. शिवाय मी विश्वास ठेवला? तुम्ही प्रायश्चित का दिलं? तुम्ही दिलेला एकही शब्द पाळला नाही हे स्विकारण्याचं धाडस तुम्ही दाखवाल का? असा सवाल देखील अनिल गोटे यांनी केला आहे. या लेटर बॉम्बमुळे भाजपमध्ये चर्चेला उधाण आलं असून भाजपमध्ये सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी गिरीश महाजनांकडे दिल्यानं नाराज झाल्याचं देखील अनिल गोटे यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. तुम्ही दिलेला शब्द २४ तासाच्या आत फिरवलात असा थेट आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण सांगत, गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी मला फोन केला असता. माझ्याशी हॉटेलवर येऊन जेवण घेतलं असतं. कारण मी गोपीनाथ मुंडेंनंतर तुमच्यावर विश्वास ठेवला. पण तुम्ही माझा विश्वासघात केलात असं या पत्रामध्ये आमदार अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

या पत्राचा शेवट अनिल गोटे यांनी ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का यार नेही लुट लिया घर यार का’ असे गाण्याचे बोल लिहित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here