घरमहाराष्ट्रभाजपच्या घाणेरड्या वागणुकीमुळे अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपच्या घाणेरड्या वागणुकीमुळे अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Subscribe

मला भाजप पक्षासोबत फार वाईट अनुभव आला. अंतर्गत गटबाजी, कटकारस्थान आणि चांगल्या नेत्याला संपवण्याचे कार्यक्रम या सार्‍या गोष्टींना कंटाळून मी आता राष्ट्रवादीत चाललो आहे. फसवणूक, धोकेबाजी हा तर त्यांचा स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे अखेर कंटाळून मी राष्ट्रवादीत चाललो आहे. भाजपने जशी घाणेरडी वागणूक दिली तशी राष्ट्रवादीकडून मिळणार नाही त्याबद्दल मला शंका नाही, असे भाजपमधील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला.

भाजप पक्षातील नेते नाराज होण्यामागे स्वत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आजूबाजूला जे टाकाऊ लोक गोळा केले होते, त्यांनी सर्व उद्योग केले. फडणवीस यांना मी तीन वेळा समजावले, तुम्हाला काही अडचण असेल तर माझ्याशी बोला. परस्पर अर्थ काढू नका. परंतु, तरीही मला पक्षात वाईट वागणूक दिली गेली. गिरीश महाजन यांचा धुळ्यामध्ये काय संबंध आहे? त्यांच्या हातात विधानसभा निवडणुकीची सूत्रे दिली गेली. पत्रकार परिषदेत ‘अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील, मला सांगितले तुम्हाला एबी फॉर्म मिळतील. मात्र, माझी फसवणूक झाली. या फसवणुकीमागे कारण काय? मी पक्षविरोधात कोणतेही काम केले नाही. तुम्हाला एवढेही धाडस नाही की, काय असेल ते तोंडावर सांगता येईल असे? तुम्ही नेते होते तर तुम्हाला बोलता यायला पाहिजे की, अनिल गोटे तुमचे हे चुकले आहे, असे अनिल गोटे म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गुरुवारी ८० वा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे निमित्त साधत अनिल गोटे यांचा पक्षप्रवेशाचाही कार्यक्रम गुरुवारी दुपारी मुंबईत संपन्न झाला. गोटे यांच्यासोबतच शिरपूरचे भाजप नेते जितेंद्र ठाकूर हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, गुरुवारी ते अधिकृतपणे पक्षात प्रवेश करणार आहेत. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अनिल गोटे यांचा मुबंईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होईल. अनिल गोटे गेल्या हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत.

याच नाराजीतून त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. याशिवाय स्थानिक राजकारणात त्यांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याने गोटे पक्षातून दूर गेले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, अनिल गोटे यांचा स्वत:चा लोकसंग्राम पक्ष देखील आहे. याच पक्षातून त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -