घरमहाराष्ट्रचंद्रपूरमध्ये तस्करांची मुजोरी वाढली; आणखी एका पोलिसाला चिरडले

चंद्रपूरमध्ये तस्करांची मुजोरी वाढली; आणखी एका पोलिसाला चिरडले

Subscribe

नाकाबंदी दरम्यान तपासणीसाठी पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र टेम्पोचालकाने पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम याचा चिरडून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसाला चिरडले आहे. जनावरे घेऊन जात असलेल्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसाला चिरडण्यात आले आहे. प्रकाश मेश्राम असं या पोलिसाचे नाव असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी वणीवरून नागपूरकडे टेम्पोमधून जनावरे घेऊन जात होते. चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान तपासणीसाठी पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र टेम्पोचालकाने पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम याचा चिरडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली आहे. यामुळे चंद्रपूरमध्ये तस्करांच्या वाढत्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दोन आरोपींना अटक

या घटनेमध्ये पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर पळून गेलेल्या दुसऱ्या गाडीला नागपूर येथील गिट्टीखदान या परिससरात पकडण्यात आले आहे. प्रकाश मेश्राम हे भद्रावती पोलीस ठाण्यात शिपाई होते. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे इम्तियाज अहमद फैय्याज (१९), मोहम्मद रजा अबुल जब्बार कुरेशी (१९) अशी आहेत. दोघेही नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रहिवासी आहेत.

- Advertisement -

पोलीस निरीक्षकाला चिरडले

दोन महिन्यापूर्वी चंद्रपूरमध्ये अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना चिरडले होते. किडे यांचा ब्रम्हापुरीतील एका रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. नाभाडी पोलीस स्टेशनमध्ये ते कार्यरत होते. नाभाडीजवळ नाकाबंदी दरम्यान अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले होते. ही घटना ताजी असतानाच आता अजून एक घटना घडल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -