राफेलशी संबंधित महत्वाचे कागदपत्र माझ्याकडे आहेत – अण्णा हजारे

जर लोकपाल असते तर राफेल घोटाळा झाला नसता, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Ahmednagar
Anna Hazare
अण्णा हजारें

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राफेल घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. अण्णांनी सांगितले की, राफेल घोटाळ्याशी संबंधित काही महत्वाची कागदपत्र माझ्याकडे आहेत. लवकरच यासंदर्भत दुसरी पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अण्णा हजारे बोलत होते.
त्यांनी असे म्हटले आहे की, ‘जर लोकपाल असते तर राफेलसारखा घोटाळा झाला नसता. माझ्याकडे राफेलशी संबंधित काही महत्वाचे कागदपत्र आहेत. मी दोन दिवस त्याचा अभ्यास करणार त्यानंतर दुसरी पत्रकार परिषद घेणार’, असल्याचे अण्णांनी सांगितले. ‘मला एक गोष्ट कळत नाही की, कराराच्या एक महिन्यापूर्वी बनलेल्या कंपनीला सहकारी कसे बनवले गेले?’ असा सवाल अण्णांनी केला आहे.

३० जानेवारीला बसणार उपोषणाला

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी कायदा लागू करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी येत्या ३० जानेवारीला उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘जर लोकपाल असते तर राफेल घोटाळा झाला नसता.’ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक, २०१३ ची अंमलबजावणी केंद्र सरकारने न केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही

गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी केलेले हे तिसरे उपोषण असणार आहे. एप्रिल २०११ ला ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पहिल्यांदा आमरण उपोषणाला बसले होते. यावेळी ३० जानेवारीला ते राळेगण सिध्दी या त्यांच्या गावी आमरण उपोषणाला बसणार आहेत. ‘जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ते उपोषण करणार आहेत. सरकार फक्त आश्वासन देत आहे. आता मी खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून आमरण उपोषण करणार’, असल्याचे अण्णांनी सांगितले.

हेही वाचा – 

निवडणुकांच्या तोडांवर अण्णांचे पुन्हा उपोषण अस्त्र

‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या’, अण्णांची मुख्यमंत्र्यांवर टीका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here