पुण्यातील ‘त्या’ बसचालकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई

बुधवारी सायंकाळी शहरात झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय जवळ उभ्या असलेल्या बसवर झाड कोसळले होते. या घटनेत विजय नवघणे यांचा मृत्यू झाला.

Pune
Announcement of financial assistance to the family of PMP deceased driver

टिळक रस्त्यावर झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या बस चालकाच्या कुटुंबीयांना पीएमपी प्रशासनाने तर्फे दोन लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी शहरात झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय जवळ उभ्या असलेल्या बसवर झाड कोसळले होते. या घटनेत विजय नवघणे यांचा मृत्यू झाला. पीएमपीएमएल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नवघणे यांचा मृत्यू झाला. या घटनेला पीएमपीएमएल प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप केला जात आहे. नवघणे यांच्या संतप्त कुटुंबीयांकडून त्यांचे पार्थिव थेट पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आले होते.

मुलाला नोकरी देणार

संतप्त कुटुंबीयांकडून कार्यालयामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी नवघणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पीएमपीएमएलकडून तातडीने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली. याचबरोबर दीनदयाळ अपघात विमा योजनेतून मदत देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवघणे यांच्या मुलाला देखील पीएमपीएमएलमध्ये कामाला घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. नैसर्गिक आपत्ती मदत मिळून देणार असल्याचे यावेळी त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी नवघणे यांचे पार्थिव कार्यालयातून घरी नेले.