घरताज्या घडामोडीठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंब म्हणाले...

ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंब म्हणाले…

Subscribe

ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. यावर अन्वय नाईक कुटुंबाने खुलासा केला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आणि त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्यांच्या अटकेनंतर भाजपाकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु झाला. अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक झाली असून किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर अन्वय नाईक कुटुंबियांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना यासंबंधी खुलासा केला आहे.

अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी केला खुलासा

किरीट सोमय्या जे दावा करत आहेत ते व्यवहार झाले आहेत, असे स्पष्टीकरण अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिले आहे. त्या म्हणाल्या की, ‘मला बऱ्याच लोकांकडून याप्रकरणी कळले असून व्हिडिओ देखील मी पाहिला आहे. पण, यात गुपित असे काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आहे आणि आम्ही ती दिली आहे. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रे असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती सहज मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रे जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते’, असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे.

- Advertisement -

बोबडी वळली आहे…

‘किरीट सोमय्या आधी झोपले होते का? अर्णब गोस्वामींना अटक झाल्यानंतर आता त्यांना जाग आली आहे’, असा सवाल आज्ञा नाईक यांनी उपस्थित केला आहे. ‘लोक कित्येक वस्तू विकत घेतात. या वस्तूंशी हा संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. किरीट सोमय्यांनी जमिनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही,’ असा इशारा अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का? – किरीट सोमय्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -