एपीएमसीत शेतमाल आणताय, ही खबरदारी घ्याच …

शेतमाल एपीएमसीमध्ये आणतानाही प्रोटोकॉल

Navi Mumbai
APMC

जीवनआवश्यक गोष्टींच्या अनुषंगाने दररोजच्या जगण्यातील महत्वाचे अशा भाज्या आणि फळांच्या बाबतीत एक गुड न्यूज आहे ती म्हणजे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची. करोनाच्या सावटामुळे ठप्प झालेली नवी मुंबई एपीएमसीची उलाढाला ही येत्या शनिवारपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यासाठीच पुरेपुर खबरदारी घेण्यात येत असून आता एपीएमसीसाठी वॉर रूमही तयार करण्यात आली आहे.

 

APMC entry
प्रवेशाच्या वेळी अस ठेवा अंतर सोशल डिस्टन्सिंगसाठीचं…
thermal scanning for corona
प्रवेशालाच तुमच अस होतय स्कॅनिंग

 

महत्वाच म्हणजे आता एपीएमसीच्या ठिकाणीही खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकऱणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठीचाच एक भाग म्हणून आता एपीएमसी मार्केटमध्ये एक मॉकड्रिलही राबविण्यात आले आहे.

APMC entry
एपीएमसीमध्ये प्रवेशांनंतर अस होतय निर्जंतुकीकरण
use sanitizer
आपले हात स्वच्छ करण्यासाठी या गोष्टी कराच

एपीएमसीमधील खबरदारी

नवी मुंबई- कृषी उत्पन्न बाजार समिती मद्ये भाजीपाला, कांदा – बटाटा आणि धान्य मार्केट सुरू करण्यासाठी कोकण आयुक्तांनी वॉर रूम तयार केली आहे. तसेच मार्केटमधून निर्जंतुकीकरण करून भाजीपाल्याची पहिली गाडी पाठवण्यात येत आहे . याचा डेमो व्यापाऱ्यांना दाखवण्यात आला आहे . त्याचबरोबर मार्केटमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील सोशल डिस्टन्स ठेऊन काम करावं लागणार आहे . बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना हात धुतल्यानंतरच मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे . आज त्या संदर्भात प्रात्यक्षिक करण्यात आले. आज फक्त 15 टोमॅटोच्या गाड्या यासाठी बाजार समितीत बोलवण्यात आल्या आहेत .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here