थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत भरता येणार अर्ज

तात्पुरती गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

पॉलिटेक्निक थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे ७ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. याच दरम्यान कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

तंत्रशिक्षण विभागातर्फे या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू आहे. नव्या वेळापत्रकाप्रमाणे ७ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीही याच दरम्यान करता येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. ऑफलाइनसह ऑनलाइन कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चितीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जिल्ह़यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.