घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त करा!

मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त करा!

Subscribe

मंत्रिमंडळाची पुन्हा राज्यपालांना विनंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी पुन्हा एकदा याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तशी विनंती केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती. मात्र, राज्यपालांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे यात काही राजकारणा शिजते आहे की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

- Advertisement -

सध्या करोनाच्या संकटकाळात सरकार जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -