घरमहाराष्ट्रबळीराजाचे भोग; गोष्ट छोटी डोंगराऐवढी!!

बळीराजाचे भोग; गोष्ट छोटी डोंगराऐवढी!!

Subscribe

२,६५७ किलो कांदा विकून मिळालेले ६ रूपये श्रेयस आभाळे या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना मनी ऑर्डरनं पाठवून दिले आहे.

गुंतवणूक २ लाखांची आणि फायदा झाला केवळ सहा रूपयांचा!! वाचून धक्का बसला ना? पण, ही व्यथा आहे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची. त्यामुळं जगायचं तरी कसं? असा प्रश्न आता बळीराजाला पडला आहे. अहमदनगरमधील श्रेयस आभाळे या शेतकऱ्यानं कांद्याच्या शेतीमध्ये २ लाख रूपये गुंतवलं. यावर्षी कांद्याचं उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात झालं. त्यामुळे दोन पैकं हाती राहतील अशी भाबडी अाशा श्रेयस आभाळेंना होती. पण, त्यांची झोळी रितीच राहिली. कारण, २,६५७ किलो एवढं कांद्याचं उत्पन्न घेवून देखील फायदा झाला तो केवळ ६ रुपयांचा!! त्यामुळे झालेला फायदा श्रेयस आभाळे यांनी सहा रूपये मुख्यमंत्री निधीसाठी पाठवत आपली व्यथा अनोख्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. पण, या साऱ्या गोष्टींचा सरकारवर काही परिणाम होईल का? हे आता पाहावं लागणार आहे.

२,६५७ किलो कांदे विकल्यानंतर श्रेयस आभाळे यांना २,९१६ रूपये मिळाले. त्यातून त्यांना गाडी खर्च आणि मजूराचा खर्च देखील भागवला. पण, हातात राहिलेली किंमत पाहिल्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. केवळ सहा रूपये हातामध्ये राहिल्यानं आता करायचं तरी काय? आणि जगायचं तरी कसं? असा यक्ष प्रश्न श्रेयस आभाळे यांच्यासमोर उभा ठाकला. त्यानंतर त्यांनी उरलेले सहा रूपये मुख्यमंत्री निधीसाठी मनि ऑर्डरद्वारे पाठवून दिली. या साऱ्या गोष्टीनंतर आता उर्वरित देणं कसं भागवायचं? असा प्रश्न देखील श्रेयस आभाळे यांना पडला आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांना पाठवले होते १,०६४ रूपये

यापूर्वी देखील नाशिकमधील संजय साठे या शेतकऱ्याला कांदा विकून मिळालेले १,०६४ रूपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवून दिले होते. किमान आता तरी आपली कैफियत सरकारला कळेल अशी त्यातून अपेक्षा होती. त्यानंतर आता श्रेयस आभाळे यांनी देखील आपली परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी त्यांना ६ रूपये मनी ऑर्डरनं पाठवले आहेत.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची घोषणा केली होती. पण, बळीराजाची अवस्था मात्र अद्याप बिकटच आहे. हे या दोन उदाहरणांवरून दिसून येत आहे.

वाचा – पंतप्रधानांना मनीऑर्डर पाठवणाऱ्या शेतकऱ्यांची घेतली दखल

वाचा – शेतकऱ्याची अजब गांधीगिरी; मोदींनाच पाठवले हजार रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -