घरमहाराष्ट्रसैन्याच्या ‘एअर बलुनचे इमर्जन्सी लँडिंग’

सैन्याच्या ‘एअर बलुनचे इमर्जन्सी लँडिंग’

Subscribe

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान आज, शनिवारी भारतीय सैन्याच्या एअर बलुनचे इमर्जन्सी लँडिंग झाले.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान आज, शनिवारी भारतीय सैन्याच्या एअर बलुनचे इमर्जन्सी लँडिंग झाले. भारतीय सैन्याच्या अचानक उतरलेल्या बलुनला पाहून ग्रामस्थांमध्ये कौतुहल निर्माण झाले होते. यासंदर्भातील माहितीनुसार भारतीय सैन्याच्या जवानांसह हे एअर बलून परतवाडा मार्गे अकोला येथे जात होते. परंतु हवेचा वेग वाढल्यानपासून सुमारे १० हजार फुटावरून उडणाऱ्या या बलुनला आकस्मिकपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर या बलुनमध्ये असलेल्या जवानांना नेण्यासाठी सैन्याचे वाहन बोलावण्यात आले. तोपर्यंत सैन्याचे बलुन पाहण्यासाठी ग्रामस्थानी मोठी गर्दी केली होती. हे बलुन नेमके कशाचे आहे, कुठे चालले असे अनेक प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झाले होते. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या जवानांना भेटून आनंद वाटल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -