घरमहाराष्ट्रनाशिकलग्नाचे आमिष दाखवून ५२ घटस्फोटीत महिलांना लाखोंचा गंडा!

लग्नाचे आमिष दाखवून ५२ घटस्फोटीत महिलांना लाखोंचा गंडा!

Subscribe

लग्न जुळविणाऱ्या ऑनलाईन वेबसाईटचा वापर करून घटस्फोटित, विधवा आणि विवाहेच्छूक महिलांना याने फसवलं.

पैसे कमावण्यासाठी एकाने बनावट नावाने जीवनसाथी डॉट कॉम आणि मॅट्रिमनी डॉट कॉम या संकेतस्थळांच्या माध्यमातून घटस्फोटित, विधवा आणि विवाहेच्छूक अशा ५२ महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या ठकास गुरुवारी (दि.५) रात्री अटक करण्यात आली. नाशिकमध्ये महिलेला भेटण्यास आलेल्या या भामट्याला खुद्द पीडित महिला, छत्रपती सेना आणि पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संपत चांगदेव दरवडे ऊर्फ मनोज पाटील ऊर्फ मयूर पाटील (३४, मूळ रा. तळेवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. मुहम्मदवाडी, हडपसर, पुणे) असे अटक झालेल्याचे नाव आहे.

लाखो रुपयांची केली फसवणूक

पोलिसांच्या माहितीनुसार, संपत दरवडे याचे २०१४ मध्ये आरती दरवडे हिच्याशी विवाह झाला. त्यावेळी त्याच्यावर १३ लाखांचे कर्ज होते. २०१५ मध्ये त्याची नागपूरमध्ये आणि पुण्यात काम करणार्‍या घटस्फोटीत महिलांशी ओळख झाली. त्यांच्याशी जवळीक साधत त्याने लग्नाचे आमिष दाखवत आर्थिक मदत मागितली. लग्न केल्यास आर्थिक अडचण दूर करण्याचे सांगून पीडित महिलांनी त्याला ५० हजार रुपये दिले. या प्रकारातून त्याने पैसे कमावण्याची युक्ती शोधून काढली. घटस्फोटित महिला, विधवा आणि विवाहेच्छूक महिलांना हेरून त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केली. तो नाशिकमध्ये घटस्फोटित महिलेला भेटण्यास येणार असल्याची माहिती पीडित महिलेकडून छत्रपती सेना आणि काही पीडित महिलांना मिळाली होती. त्यानुसार नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग येथील पीडित महिला गुरुवारी (दि.५) नाशिकमध्ये दाखल झाल्या. त्यांच्यासह छत्रपती सेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी भामट्याला पंचवटी कारंजा येथील मानस हॉटेलमधून अटक केली. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मला जीवनसाथी टॉक कॉमला रिक्वेस्ट पाठविली आणि मी ती एक्सेप्ट केली. त्यानंतर तो मला नागपुराला भेटायला आला. भेटल्यानंतर तो बोलेल्या मी तुझ्या वडीलांसोबत फोनवर बोलेल तू आपल्यबाबत घरी सांग. पण त्याच्या वडिलांना फोन आलाचं नाही. काही दिवसांनंतर त्याने मला फोन केला करून त्याला २ लाख रुपये पाहिजे आहे हे सांगितलं. म्हणून पैसे घेण्याकरिता तो २० तारखेला घरी आला. मी त्याला बोले चेक देते पण त्याने चेक घेण्यास नकार दिला आणि तो २ लाख कॅश घेऊन गेला. मग मला एक कॉल आला की, त्याने एका मालवणच्या मुलीला फसवलं आहे आणि तो हेच काम करतो. तर म्हणून आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप केला. आम्ही छत्रपती सेनेकडून मदत मागितली आणि त्यामधील भूषण सरांनी आम्हाल खूप मदत केली. आज त्याला पडलं असून त्याला अशी शिक्षा द्याला पाहिजे. जेणेकरून तो पुन्हा अशी फसवणूक करणार नाही. त्याने आमचं आर्थिक आणि मानसिक नुकसान केलं आहे. त्याने केलेलं आर्थिक नुकसान आम्हाल परत हवी आहे. – पीडित महिला 

मी घटस्फोटीत महिला असून मला एक सात वर्षांची मुलगी आहे. मला काही दिवसांपूर्वी मालवणच्या मुलींचा फोन आला होता. तिने विचारलं की, संपत दरवडे ऊर्फ मनोज पाटील यांना ओळखतात का? तर मी तिला बोलले की हो, ते चार महिन्यांपूर्वी घरी येऊन गेले होते. पण त्या मुलीकडून मला असं कळलं की, तिचं दुसरं लग्न होऊन तिची फसवणूक झाली आहे. तर मला ती बोली की, त्याला पकडण्यामध्ये मला मदत करालं का? मग आम्ही छत्रपती सेनेचे कार्यकर्ते भूषण यांना संपर्क केला. त्यानंतर आम्ही त्यांच्या मदतीने सापळा रचला आणि आम्ही संपत दरवडे ऊर्फ मनोज पाटील याला पकडले. हा व्यक्ती सहाभूती दाखवून महिलांना फसवतं होता आणि मुलींच्या भावनेशी खेळतं होता. त्याच्या फक्त पैस कमाविणे हाच हेतू होता. लग्नाबाबतचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. अशा फेक लोकांपासून दूर राहा. – पीडित महिला २

- Advertisement -

माझं आणि त्याचं वैदिक पद्धतीने झालं होत. पण मी नंतरला काही मुलींशी संपर्क करू विचारपूस केली की, तुमची लग्नाबाबत बोलणी झाली आहे का? त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, हो, आमच्यासोबत लग्नाबाबत बोलणी झाली आहे आणि आमच्याकडून त्याने पैस उकळले आहेत. माझ्याकडून त्याने तब्बल ९ लाख रुपये उकळले आहे. – पीडित महिला ३ 


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा झाला एन्काऊंटर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -