घरमहाराष्ट्रअरुअप्पा जोशी अकादमीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी

अरुअप्पा जोशी अकादमीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी

Subscribe

रत्नागिरीच्या अरुअप्पा जोशी अकादमीच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे. ८ हजार ९२१ पदांसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

मुंबई उच्च न्यायालयामार्फत जिल्हा न्यायालयासाठी घेतलेल्या कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पद भरतीमध्ये अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या वीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. १३० कनिष्ठ लिपिक आणि ७० शिपाई या रिक्त पदांची संख्या घोषित झाली होती. एकूण आठ हजार ९२१ पदांसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सर्व प्रवेश फेऱ्या पार करून अंतिम निवड झालेल्यांमध्ये अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार आज र. ए. सोसायटीच्या हॉलमध्ये करण्यात आला.

निवड झालेल्या उमेदवारांची नावे

अरुअप्पा जोशी स्पर्धा पअकादमीच्या १४ विद्यार्थ्यांची कनिष्ठ लिपिक पदासाठी तर ६ विद्यार्थ्यांची शिपाई पदासाठी निवड झाली आहे. दहा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांबाबत नियमित वर्ग केले आहेत. उर्वरित विद्यार्थी मुलाखत टप्प्यांसाठी अकादमीच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते. निवड झालेल्या उमेदवारांची नावे अशी- अश्विनी गवळी, आदिती बने, स्वप्नाली गीते, चारुशीला राऊळ, विजय उदाळे, पराग जाधव, प्राजक्ता भाटकर, सायली शेट्ये, मुबाशिर काझी, शिवानी भोंगले, ओंकार नेवरेकर, भक्ती चव्हाण, कविता पड्यार, ज्ञानेश्वकर मुरकुटे, रुपेश गुरव, वेदिका निमकर, सुमेध कोसले, स्वप्नाली शिंदे, हर्षद रावणांक, रंजिता बंडीवडार ही नावे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -