डर होना जरुरी है! पोलीस दिसताच पत्नीला सोडून नवऱ्याने काढला पळ

पुण्याच्या अलका चौकात ही घचटना घडली आहे.

Pune
police

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, लोकांना या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. संचारबंदी असताना देखील लोक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. या फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसी खाक्या दाखवत लोकांना घरची वाट दाखवली. पोलिसांबद्दल असलेली भीतीची प्रचिती आज पुण्यात दिसून आली.


हेही वाचा – पुढचे २० दिवस महत्त्वाचे असतील – उद्धव ठाकरे

पुण्यात अलका चौकात एका चारचाकी गाडीची चौकशी पोलीस करीत होते. त्यामागे एक दुचाकीस्वार आला. त्याने गाडी थांबविली. त्यावेळी त्याच्या मागे बसलेली त्याची पत्नी तेवढ्यात खाली उतरली. पोलिसांना पाहताच दुचाकीस्वाराने बायकोला तिथेच ठेवत दुसर्‍या बाजूने धूम ठोकली. पतीने ठेवून जाताच ती महिला अवाक् झाली. आता मी कशी जाऊ, त्यांचा मोबाईल देखील माझ्याकडे आहे, असे म्हणत काही मिनिट त्या ठिकाणी थांबली. मात्र, पती काही पुन्हा आला नाही, त्यामुळे ती महिला चालत निघून गेली.

आज अनेक ठिकाणी नागरिक बाहेर पडले होते. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. काही ठिकाणी तर पोलिसांनी बाहेर पडलेलेया लोकांच्या हातात, “मी समाजाचा शत्रू आहे,” असा फलक हातात दिला. दरम्यान, आज मध्यरात्रीपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here