घरमहाराष्ट्रवजन वाढते म्हणून पत्नीला त्याने चक्क उपाशी ठेवले!

वजन वाढते म्हणून पत्नीला त्याने चक्क उपाशी ठेवले!

Subscribe

पीडित महिलेने पतीच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हल्ली सुंदरतेची व्याख्याच बदलेली आहे. प्रत्येक तरुणाला सुंदर, बारिक आणि सडपातळ बायको असावी असे वाटत आहे. याच मोहापाई पुण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका पुरुषाने पत्नीचे वजन वाढू नये म्हणून तिला चक्क उपाशी ठेवले आहे. याप्रकरणी पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलांवर होणाऱ्या विविध लैंगिक आणि मानसिक छळांमध्ये आता अशाप्रकारच्या छळांचीही सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – पतीच्या छळाला वैतागून केली आत्महत्या

- Advertisement -

नेमंक काय आहे प्रकरण?

पुण्याच्या उंड्री येथील इस्टेट इस्टोनिया सोसायटीत एक पती-पत्नी दांम्पत्य आपल्या दोन लहान मुलांसोबत राहत होते. २००६ ते २०१६ दरम्यान ते एकत्र राहत होते. परंतु, या दरम्यान पती-पत्नीमध्ये सतत मतभेद आणि वाद व्हायचे. भांडण झाल्यावर पती तुझे वजन वाढले आहे, असे सांगत तिला उपाशी ठेवत. असे बऱ्याचदा घडत होते. आपल्याला उपाशी का ठेवले? यावर महिलेने प्रश्न विचारला तर या विषयावरही त्यांचे भांडण होत असे. काही दिवसांपूर्वी या महिलेचा पती तीला न सांगता घर सोडून बावधन येथे राहण्यास गेला. त्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. पीडित महिलेने पतीच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोघे पती-पत्नी एका खासगी कंपनीत कामाला होते. परंतु, पीडित महिलेची गेल्या महिन्यात नोकरी गेली. तिच्यावर दोन लहान मुलांची देखील जबाबदारी आहे. यात आणखीन पतीने घर विकण्याचा तगादा लावला आहे. मुलांचे संगोपन आणि नोकरी यामध्ये अडथळा येत असतानाच पतीने आता घरही विकण्याचा तगादा लावल्यामुळे महिलेने न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा – हुंड्यासाठी अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -