घरमहाराष्ट्रआषाढीचा पायी दिंडी सोहळा रद्द

आषाढीचा पायी दिंडी सोहळा रद्द

Subscribe

हेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पादुका

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीचा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढीला कुठलीही दिंडी काढायची नाही, परंतु; हेलिकॉप्टरमधून आषाढी एकादशीला मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आणण्यात येणार आहेत. या पालख्यांसोबत फक्त पाचजण असतील, असा निर्णय झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या रोगामुळे अनेकांचा मृत्यू देखील होत आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याकारणाने गर्दी टाळणे, त्यावर एक उपाय समजला जात आहे. यामुळे पंढरपुरात लाखो भाविकांच्या भरणार्‍या आषाढी यात्रेबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बैठक घेतली आहे. या बैठकीसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहणीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मंदिर समितीच्या सदस्या माधवी निगडे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होती.

- Advertisement -

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपान काका महाराज, श्री संत मुक्ताई महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत तुकाराम महाराज या सहा पालख्यांना पंढरपुरात प्रवेश मिळणार आहे. या पालख्यांसह प्रत्येकी पाच लोक असणार आहे. पंढरपुरात श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी स्वागत करणार आहे. सर्व पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला आणण्यात येतील, मात्र हवामान खराब असल्यास एसटीने एक दिवस आधी म्हणजे दशमीला पंढरपुरात येतील. आषाढी एकादशीला विठ्ठलाची भेट घेऊन ते परत निघतील, असे या बैठकीमध्ये ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -