घरमहाराष्ट्रमहाआघाडीने नांदेडमधून फुंकलं प्रचाराचं रणशिंग!

महाआघाडीने नांदेडमधून फुंकलं प्रचाराचं रणशिंग!

Subscribe

नांदेडमध्ये आज, बुधवारी महाआघाडीची जाहीर सभा होत असून लोकसभा निवडणुकीचे रंगशिंग फुंगले जात असल्याने सर्व राज्याचे या सभेकडे लक्ष लागले आहे. सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाषणाला सुरुवात केली असून त्यांनी सेना-भाजपच्या युतीवर सडकून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत सेना – भाजप एकमेकांना शिव्या देत होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते, युती गेली चुलीत. पण आता युती झाली. त्यामुळे आता शिवसेनेचा स्वाभिमान गेला चुलीत, असं म्हणायची वेळ आली आहे. टायगर लाचार है… ही स्थिती शिवसेनेची झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -