घरमहाराष्ट्रपुढचा विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा

पुढचा विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा

Subscribe

वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी’ टीम म्हणणार्‍यांची अवस्था आता ‘बी’ टीमसारखी झाली असून वंचित आघाडी ‘ए’ टीम झाली आहेे. पुढे हीच वंचित आघाडी विधानसभेत विरोधकांचे काम करताना दिसेल. त्यांचाच विरोधी पक्ष नेता असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हालत इतकी वाईट झालेली असेल की त्यांना साधे विरोधी पक्षनेतेपदही मिळवता येणार नाही, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणावरून भाजपवर होणारे सर्व आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल

- Advertisement -

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समाचार घेतला. नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भडकले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वैयक्तिक टिप्पणी करणे टाळले. मात्र, शरद पवारांनी काळाची पावले ओळखायला हवीत. लोकांना सध्या नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आश्वासक वाटत आहे.

राष्ट्रवादी हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे. तिथे लोकांना भविष्य नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये येत आहेत. त्यावर पवारांनी काय प्रतिक्रिया द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. नारायण राणे हे भाजपमध्येच आहेत. ते भाजपचे खासदार आहेत. प्रश्न केवळ त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा आहे. शिवसेनेला विश्वासात घेऊन तो सोडवण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

अनिल परब प्रवक्ते आहेत का?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी येथून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असे शिवसेना आमदार अनिल परब यांनी जाहीर केले. यावर आदित्य यांच्यावर वैयक्तिक बोलणे टाळताना मुख्यमंत्र्यानी परब यांना लक्ष्य केले. अनिल परब प्रवक्ते आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांनी ज्योतिषी व्हावे

लोकसभा निवडणुकीपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपाचा छुपा पाठिंबा होताच. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीला ते विरोधी पक्ष नेता करायला निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता पुढचे दिसू लागल्यामुळे त्यांनी ज्योतिषी म्हणून काम करावे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होत

देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाहीत, त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते. चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतले जात आहे, असाही आरोप चव्हाण यांनी केला.आघाडी सरकारच्या काळातदेखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी घोटाळेबाजांवर कारवाई केली. पण यांच्या कार्यकाळात तर लाखो कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच अनेक भागांत घोटाळ्यांची प्रकरणे पुढे येत आहेत. त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होणार आहे. याचे अद्याप योग्य स्पष्टीकरण सरकारकडून दिले गेले नाही, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -