घरमहाराष्ट्रअकोल्यात ‘वंचित’ मुसंडी मारणार का?

अकोल्यात ‘वंचित’ मुसंडी मारणार का?

Subscribe

जिल्ह्यावर प्रभाव असलेला पक्ष - भाजप

अकोला जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत, फक्त बाळापूर विधानसभा मतदारसंघात भारिपचे आता वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. सध्याच्या टप्प्यात बाळापूरसाठी उमेदवारांची निवड कठीण झाली आहे. 1999 च्या निवडणुकीत शेवटच्या वेळी काँग्रेस-भारिप आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव तायडे विजयी झाले. त्याचप्रमाणे 2004 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नारायणराव गव्हाणकर विजयाच्या जोरावर होते. त्यानंतर 200९ आणि 201४च्या निवडणुकीत भारिपचे उमेदवार बळीराम सिरस्कर विजयी झाले होेते. मागील निवडणुकांत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, भारिप यांनी ‘एकला चलो रे’ च्या धर्तीवर निवडणुका लढवल्या. आता परिस्थिती बदलली आहे. भाजप-शिवसेना यांची युती झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी अबाधित आहे, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर रिंगणात उतरणार आहे. काँग्रेसबरोबर आघाडी होण्याची त्यांची शक्यता जवळजवळ संपली आहे, तसेच एमआयएमशीही त्यांची आघाडी तुटली आहे. अशा परिस्थितीत वंचित आघाडीसमोर ताकदवान उमेदवार उभे करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बाळापूर विधानसभेसाठी शिवसेनेने दावा केला आहे. मात्र, भाजपही या जागेसाठी उत्सूक आहे. कारण या जागेसाठी भाजपमध्येच इच्छुक उमेदवार जास्त आहेत. वंचित बहुजन आघाडी ही जागा कायम राखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी उमेदवार देण्याआधी वंचितला काँग्रेस कोणता उमेदवार देणार आहे, याची चाचपणी करावी लागणार आहे. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला विशेष वाव नाही.

- Advertisement -

तरीही गेल्या दोन निवडणुकांच्या पराभवाचे यंदा विजयात रूपांतर करण्यासाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी विशेष प्रयत्न करेल. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अन्य विधानसभांच्या जागांवरही वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार आहे. लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे दोन्ही काँग्रेसची मते कमी झाली होती, त्यामुळे काँग्रेसला लोकसभेच्या ९ जागा गमवाव्या लागल्या, तर १५ जागांवर वंचित बहुजन आघाडीने दुसर्‍या-तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली होती. तसेच अकोला जिल्ह्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव सर्वाधिक आहे, त्यामुळे इथे वंचित मुसंडी मारणार का, हे पहावे लागेल.

अकोला जिल्ह्यातील विधानसभानिहाय आमदार व पक्ष
अकोट – आ. प्रकाश भारसकाळे – भाजप
बाळापूर – आ. बळीराम सिरस्कर – भारिप
अकोला पश्चिम – आ. गोवर्धन शर्मा – भाजप
अकोला पूर्व – आ. रणधीर सावरकर – भाजप
मूर्तिजापूर – आ. हरिश पिंपळे – भाजप
रिसोड – आ. अमित झनक – काँग्रेस

- Advertisement -

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -