महाराष्ट्रात परिवर्तन दिसेल; नवाब मलिक यांचा विश्वास

हे सरकार बदलले पाहिजे आणि महाराष्ट्रात परिवर्तन झाले पाहिजे अशी जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल येईल, तेव्हा महाराष्ट्रात परिवर्तन झालेले दिसेल', असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra
Nawab Malik Slams BJP
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

‘गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी अडचणीत आले असून बरेच शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच सध्या आर्थिक मंदीचे संकट देखील वाढले असून बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हे सरकार बदलले पाहिजे आणि महाराष्ट्रात परिवर्तन झाले पाहिजे अशी जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल येईल, तेव्हा महाराष्ट्रात परिवर्तन झालेले दिसेल’, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा – Assembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल


काय म्हणाले नवाब मलिक?

महाराष्ट्रासह देशात उत्सुकता लागलेल्या विधानसभा निवडणुकांची आज केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे आम्हीही तयारीला लागलो आहोत. २० ते २१ ऑक्टोबरला निवडणुका होतील, याचा आम्हाला साधारण अंदाज होता. राज्यघटनेला अनुसरून निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, असे आयोगाने म्हटले आहे. त्याप्रमाणे होतील अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून करतो, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.


हेही वाचा  – साताऱ्यातील पोटनिवडणूक लांबणीवर