Assembly Elections 2019 : उमेदवार ‘इतकेच’ पैसे खर्च करु शकतो

विधानसभा निवडणुकांची आज केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली असून या निवडणुकीत उमेदवार किती पैसे खर्च करु शकणार याचे रक्कम देखील सांगण्यात आली आहे.

Maharashtra
Assembly Elections 2019 The candidate can spend 28 lakh

महाराष्ट्रासह देशात उत्सुकता लागलेल्या विधानसभा निवडणुकांची आज केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असल्याचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

उमेदवार इतकेच पैसे खर्च करु शकतो

निवडणुक कोणतीही असो. या निवडणुकीत उमेदवारांकडून वारेमाप पैशाची उधळण केली जाते. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराला फक्त २८ लाख रुपये खर्च करता येणार असल्याचे मुख्य निवडणुक आयुक्तांनी सांगितले आहे. हे नियम दोन्ही राज्यांना लागू असणार आहेत. तसेच राजकीय पक्षांनी पर्यावरणाचे भान ठेवून प्रचारात प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि पर्यावरणाचे भान ठेवून प्रचार करावा, असे आवाहन देखील निवडणुक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवाळी आधी फुटणार फटाके

विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असून २५ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच फटाके फुटणार आहेत.


हेही वाचा – नक्की वाचा! ‘या’ तारखा आहेत महत्त्वाच्या