कोरोना व्हायरस : हेड कॉन्स्टेबलची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

मुंबईसह राज्यात सध्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उन्हा तान्हात उभे असलेले आपल्याला पोलीस बांधव दिसतात.

Mumbai
राज्यात सध्या कोरोनाचे संकट उभे असून, या संकटात नेहमी प्रमाणे रस्त्यावर उभे आहेत ते पोलीस बांधव. मुंबईसह राज्यात सध्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उन्हा तान्हात उभे असलेले आपल्याला पोलीस बांधव दिसतात. कधी हे पोलीस बांधव घरातून बाहेर पडणाऱ्यावर कारवाई करताना देखील चित्र पहायला मिळत. पण याच खाकीवर्दीतील माणुसकी देखील याच निमित्ताने पहायला मिळत आहे. अशीच एक खाकीतल्या माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे. मुंबईतल्या डोंगरी येथील हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० हजार रुपयांचा धनादेश दिला. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी सढळ हस्ते मदत केली.

गृहमंत्र्यांनीही मानले आभार 

जगभर पसरलेल्या कोरोनामुळे लोकांचे होणारे हाल बघून आपल्या राज्यात देखील हेच संकट आले असून त्यावर मात करता यावी यासाठी श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली. याचे खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागातही खाकीचे दर्शन 

विशेष बाब म्हणजे कोरोनामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना हे पोलीस बांधव राज्यातील विविध भागात आपले खाकिचे दर्शन घडवत आहेत. राज्यातील विविध भागात गरिबांना जेवणाची देखील व्यवस्था पोलिसाकडून केली जात आहे. नुकतेच सांगलीमध्ये पोलिसांनी तब्बल ६०० मजुरांसाठी जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय केली होती. आजी पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक देखील केले गेले होते.