यवतमाळः ‘कोरोना’युद्धासाठी सुट्ट्यांचा त्याग; सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऑन ड्युटी

Yawatmal
assistant police inspector on duty till last day of retirement for fight against corona in yawatmal
यवतमाळः 'कोरोना'युद्धासाठी सुट्ट्यांचा त्याग; सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऑन ड्युटी

कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि कामगार दिवसरात्र मेहनत करत आहेत. या अत्यावश्यक सेवेतील पोलिस प्रशासन देखील २४ तास आपले समाजाप्रती असणारे कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत. असेच एक यवतमाळचे पोलीस आपल्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऑन ड्युटी कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

‘कोरोना’लढ्यासाठी सुट्ट्यांचा त्याग

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे लोहारा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोलिस दलात आयुष्यातील ३५ वर्षांची सेवा बजावली. सेवानिवृत्तीच्या आधी तीन महिने रजा मंजूर असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. कोरोनाचे संकट देशभरासह महाराष्ट्रावर ओढावले असताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांना घरी राहवले गेले नाही. सेवानिवृत्तीच्या आधी तीन महिने रजा मंजूर असतानाही त्यांनी आराम न करता आपल्या सेवेला तसेच कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत ते ऑन ड्यूटी समाजासाठी सेवा देत होते. त्यांनी ३५ वर्षांच्या सेवेतील शेवटच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपले कर्तव्य बजावले.


हेही वाचा – 25 टक्के वेतन कपातीस विरोध