घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडीच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले - रामदास आठवले

महाविकास आघाडीच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले – रामदास आठवले

Subscribe

दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या ११ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करणार.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे, घरे जाळल्याचे, दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आठवले यांनी केला असून, दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या ११ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान हे आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिली असून, आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचनाही देण्यात आल्याचे आठवले यावेळी सांगितलं.

म्हणून ११ जुलैला आंदोलन

राज्यात दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या प्रश्नावर निषेध आंदोलन करण्यासाठी ११ जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे. ११ जुलै १९९७ रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात ११ जण शाहीद झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी ११ जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते तसेच या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन करते. त्यामुळे ११ जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार आहेत अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसासह दोघांवर गुन्हे दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -