लवकरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार – चंद्रकांत खैर

उद्धव ठाकरेचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. औरंगाबादकारांना उद्धव ठाकरे कधीही सरप्राईज देतील, असं चंद्रकांत खैर म्हणाले.

Aurangabad
aurangabad name change to sambhajinagar will soon shivsena leader says chandrankant khaire
लवकरच औरंगाबादचं नावं संभाजीनगर होणार - चंद्रकांत खैर

सध्या औरंगाबादच्या नावावरून चांगलचं राजकारण सुरू आहे. मनसेने औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैर यांनी औरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे कधीही औरंगाबादकरांना सरप्राईज देतील आणि या निर्णयावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विरोध करणार नाही असं स्पष्ट केलं आहे. ‘आता राज ठाकरे ही मागणी करत आहेत. १९८८ पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे औरंगाबदचा उल्लेख संभाजीनगर असाच उल्लेख करत आहेत. ही मागणी शिवसेनेनेच लावून धरली होती. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर ठेवलं जावं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेचं हे स्वप्न पूर्ण करतील इतर कुणाही ते जमणार नाही’, असं एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैर यांनी स्पष्ट केलं.

मनसेने पाकिस्तान आणि बांगलादेशी खुसघोरांविरोधात मोर्चा केल्यानंतर आता मनसे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी करत आहे. मराठावाडा दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी संभाजीनगर असा उल्लेख करून बॅनर्स लावले होते. तसंच मुंबईत कुर्ला एसटी डेपोमध्ये देखील मनसेकडून याबाबत आंदोलन करण्यात आलं होत. याशिवाय मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-औरंगाबाद एसटी बसेसवर संभाजीनगर नावाचे पोस्टर्स लावले होते.

नाशिकमधील लोक विकासाला मत देत नाहीत – राज ठाकरे

मराठवाड्यातील पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्याविषयी भाष्य केलं. शहरांचा विकास करणं, ती शहरं घडवणं हा माझ्यासाठी राजकीय विषय नसून माझ्या पॅशनचा विषय आहे. जगातील इतर शहरांना जेव्हा पाहतो तेव्हा तिथल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात असाव्यात असं मला वाटतं. त्यामुळे मी नाशिकमध्ये अनेक गोष्टी घडवल्या मात्र नाशिकमधील लोक विकासाला मत देत नाहीत हे माझ्या लक्षात आलं, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.


हेही वाचा – ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने रोहित पवारांचा केंद्र सरकारला चिमटा