घरताज्या घडामोडीऔरंगाबाद : लाइट बंद होताच केली दगडफेक; महिला जखमी

औरंगाबाद : लाइट बंद होताच केली दगडफेक; महिला जखमी

Subscribe

लाइट्स बंद होताच औरंगाबादमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये एक महिला जखमी झाली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला. त्यानंतर पंतप्रधानांनी रविवारी ९ वाजता ९ मिनिटे लाइट्स बंद करुन दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश लावण्यास सांगितले. दरम्यान, या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी औरंगाबादमध्ये दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एका महिलेचे डोके फुटल्याची घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

औरंगाबादमधील भारत नगरच्या प्लॉट नंबर ५९ मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोदींच्या घोषणेनंतर शहरात घरोघरी रविवारी रात्री ९ वाजता विजेचे दिवे बंद करण्यात आले आणि दिवे, मेणबत्त्या पेटवण्यात आल्या होत्या. त्यावेळी अंधारात अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये प्रमिला नरवडे जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, ही दगडफेक कोणी आणि का केली हे अद्याप कळू शकलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या जेवणाची चव जाणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -