घरमहाराष्ट्रभरधाव रिक्षाची विद्यार्थिनींना धडक, २ विद्यार्थिनी जखमी

भरधाव रिक्षाची विद्यार्थिनींना धडक, २ विद्यार्थिनी जखमी

Subscribe

अंबरनाथमध्ये भरधाव रिक्षाने दोन विद्यार्थिनींना धडक दिली आहे. यामध्ये दोन्ही विद्यार्थींनी गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, धडक देणारा रिक्षाचालक फरार झाला आहे.

अंबरनाथ येथील फातिमा शाळेच्या गेटजवळ मुख्य रस्त्याने भरधाव जाणाऱ्या रिक्षाने दोन शालेय विद्यार्थिनींना धडक दिली. त्यामुळे विद्यार्थींनी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. आरोपी रिक्षाचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुभाषवाडी परिसरात असलेल्या फातिमा शाळेत मिताली आणि श्रावणी या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या दोघी विद्यार्थींनी ६ वी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासोबत ही घटना घडली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन्ही विद्यार्थींनी शाळेच्या समोरील रस्ता क्रॉस करून आत जात असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाचालकाने त्यांना धडक दिली. या घटनेत दोन्ही विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. आरोपी रिक्षाचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आणि काही दुकानांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असून त्यातील फूटेजवरून आरोपीचा तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

पालकांची तक्रार

सध्या शहरात बेसुमार रिक्षा वाढल्या असून, अल्पवयीन मुलंदेखील मोठया प्रमाणात रिक्षा चालवीत आहेत. पोलिसांसमोरच रिक्षाचालक ओव्हरसीट घेऊन जातात. भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालक सुसाट वेगाने रिक्षा चालवतात. जागेवरच रिक्षा उभ्या करतात, जागेवरच टर्न मारतात, अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलीस कोणतीच कारवाई करीत नसल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -