अवनी शिकार प्रकरण: गडकरींनी केली मुनगंटीवारांची पाठराखण

सुधीर मुनगंटीवार यांची काही चूक नसून त्यांनी राजीनामा देण्याची मागणी हास्यास्पद असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

Nagpur
Nitin Gadkari
नितिन गडकरी

नरभक्षक अवनी टी-१ वाघिणीच्या शिकार प्रकरणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. यासंदर्भात नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी म्हणाले की, अवनीच्या मृत्यूचे दुःख आहे, परंतु, त्यात सुधीर मुनगंटीवारांचा कोणताही दोष नाही. मुळात मुनगंटीवारांचा राजीनामा मागणे हे हास्यास्पद असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुनगंटीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थन केले आहे.

हे वाचा – अवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर

यासंदर्भात गडकरी म्हणाले की, ही वाघीण नरभक्षक झाल्याने तिने १३ निरपराध लोकांचा जीव घेतला होता. त्या १३ लोकांच्या घरी दिवाळीच्या दिवशी काय परिस्थिती होती. या संदर्भात कोणीही दखल घेतली नाही. मात्र, वाघिणीला मारल्याचे राजकारण करण्यात प्रत्येक जण पुढाकार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भविष्यात त्या वाघिणीने पुन्हा कोणत्या निष्पाप लोकांचा बळी घेतला असता म्हणून तिला ठार मारावे लागले. वाघीण मेल्याचे दुःख असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. वाघिणीला मारण्याचा निर्णय हा लोकप्रिय नसला तरी ते करणे अपरिहार्य झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रकारे या घटनेचे राजकारण करण्यात आले, त्याचे दुःख झाल्याची नाराजी गडकरी यांनी व्यक्त केली.

शूटर म्हणतो – अवनीचे बछडेही नरभक्षकच होणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here