घरट्रेंडिंगटाईट जीन्सचा वापर, परिणाम थेट 'शुक्राणूं'वर

टाईट जीन्सचा वापर, परिणाम थेट ‘शुक्राणूं’वर

Subscribe

थेट शुक्राणूंवर परिणाम करणारी अशी लाईफस्टाईल डिझिजचा परिणाम म्हणून समोर आला आहे.

आपल्या प्रत्येकाच्या कपड्यांच्या कलेक्शनमध्ये एक तरी टाईट जीन्स असतेच असते. थोड्याशा वेळानंतर ही टाईट टीन्स आपल्याला अस्वस्थ करू लागते. आपल्याला कम्फर्ट देणारे कपडेच शक्यतो आपण वापरावे असा तरी मुंबईसारख्या शहरासाठीचा एक सरळ साधा लाईफस्टाईला फंडा आहे. पण टाईट जीन्सचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या परिणामामुळे आपल्यावर एक मोठे संकट ओढावले जाऊ शकते. होय, टाईट जीन्समुळे पुरूषांच्या शरीरात शुक्राणुंचे प्रमाण कमी होत आहे. डॉ अमोल अन्नदाते यांनी याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल केला आहे.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणात शहरी भागात वापरल्या जाणाऱ्या जीन्सच्या वापराचा दुष्परिणाम म्हणून हा एक ट्रेंडी लाईफस्टाईलचा धोका म्हणून समोर येत आहेत. मुख्यत्वेकरून पुरूषांसाठी या जीन्सचा वापर हा आरोग्यावर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो. महत्वाच म्हणजे जीन्सच्या वापरामुळे पुरूषांच्या शुक्राणुवर परिणाम होतो असे डॉ अमोल अन्नदाते यांचे म्हणणे आहे. टाईट जीन्समुळे वापरल्याने एकुणच शरीराच्या तापमानातही फरक पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुरूषांच्या शरीराच्या रचनेत पुरूषांची वीर्योत्पादक ग्रंथीचा भाग म्हणजे (टेस्टीज) हा शरीराबाहेर असतो. टाईट जीन्सच्या वापरामुळे या शरीराच्या भागाचे तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा वाढते. परिणामी शुक्राणुंची संख्या सातत्याने कमी होण्यावर याचा परिणाम होतो. शरीराच्या रचनेनुसार आणि आवश्यकतेनुसार मुळातच आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा या टेस्टीजचे तापमान हे कमी राहणे गरजेचे असते. पण टाईट जीन्सच्या वापरामुळे नेमकी उलटी स्थिती होते. एरव्ही आपल्याला शरीराअंतर्गत झालेला बदल पटकन जाणवणारा नसला तरीही नकळत हा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम घडवणारा असा आहे. परिणामी व्यंधत्वासारख्या समस्येलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अमोल अन्नदाते यांनी केलेल्या सूचनेनुसार रहना है हिट, तो मत पहनो टाईट फिट जीन्स असा सल्ला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -