दिलदार बच्चू कडू; तहसीलदाराच्या वैद्यकीय उपाचारासाठी मिळवून दिली ९ लाखांची मदत

bacchu kadu helps tahsildar cast
राज्यमंत्री बच्चू कडू यांची मदत

“बच्चू कडूंची अधिकाऱ्यास मारहाण, बच्चू कडूंचा अधिकाऱ्यांना चोप…” अशा आशयाच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. सध्या राज्यमंत्री असलेले बच्चू कडू अपक्ष आमदार असल्यापासून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलने करत आले आहेत. या आंदोलनादरम्यान त्यांना अनेकदा तुरुंगात देखील जावे लागले. मात्र मंत्री झाल्यापासून त्यांनी आंदोलनापेक्षा विधायक मार्गाचा वापर करत लोकांना न्याय मिळवून दिला. याचाच प्रत्यय आता अधिकारी वर्गाला आला आहे. एका तहसिलदाराला वैद्यकीय उपचारांसाठी बच्चू कडूंनी ९ लाखांची मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यातील एका दिलदार व्यक्तिमत्त्वाचा अनुभव राज्यातील अधिकारी वर्गाला आला आहे.

बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत हा प्रसंग सांगितला आहे. “चांदुर बाजार येथील नायाब तहसीलदार यांचा गंभीर अपघात झाला होता. उपचाराकरीता कुटूंबास आर्थिक बोजा सहण करावा लागला हे भेटी दरम्यान कळाले. कर्मचारी अपघात विम्यातुन त्यांना ९ लक्ष रुपये मदत करण्यात आली. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा फोन आला. केलेल्या मदतीकरीता त्यांनी आभार मानले..”

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे बच्चू कडू प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्यावर शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्याकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दोन दिव्यांग मुलींच्या पालकांना घरकुल आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला होता. विशेष म्हणजे बच्चू कडूंनी या दोन्ही दिव्यांग मुलींच्या घरी जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती.

बच्चू कडू कोरोना काळातही लोकांमध्ये मिसळत होते. त्यांची कामे करत होते. यातच त्यांना १९ सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. थोडे दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने ते कामाला लागले आहेत. सध्या. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात त्यांनी आवाज उचलला आहे.

बच्चू कडू यांचा व्हिडिओ

आमदार बच्चू कडू यांचे शिवाजी महाराजांच्या विचारांवर जबरदस्त भाषण

बच्चू कडू यांचे भाषण