घरमहाराष्ट्रकोपर्डी हल्ल्याप्रकरणी आरोपींचा जामीन मंजूर

कोपर्डी हल्ल्याप्रकरणी आरोपींचा जामीन मंजूर

Subscribe

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला केल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या चार तरुणांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवबा संघटनेचे राजू जऱ्हाड, अमोल खुणे, बाबू वाळेकर आणि गणेश खुणे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अटक केल्याच्या दीड वर्षानंतर न्यायालयाने जामीनाला मंजूरी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. कोपर्डीतील नराधमांना न्यायालयात आणले असता तेथे उपस्थित असलेल्या जमावाने त्या नराधमांना मारहाण केली होती. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती.

या तरुणांना झालेली अटक ही त्यांच्या कोणत्याही वैयक्तीक कारणासाठी झालेली नव्हती. परंतु त्यांची कुणीही दखल घेत नव्हते. ही गोष्ट माजी खासदार निलेश राणे यांना कळली तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काही महिन्यांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी त्या तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. या तरुणांना जामीन मिळावा यासाठी चांगल्या वकिलाची गरज होती. निलेश राणे यांनी जेष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांना विनंती केली. या न्यायालयीन लढाईसाठी जो काही खर्च येईल, तो करण्याचीही तयारी माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला तेव्हा निलेश राणे यांनी दिलेल्या या आधाराने त्या तरुणांचे कुटुंबीय भारावून गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -