घरमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे योजना; अपघातग्रस्तांना होणार 'हा' लाभ

बाळासाहेब ठाकरे योजना; अपघातग्रस्तांना होणार ‘हा’ लाभ

Subscribe

या योजनेतंर्गत अपघातग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी थेट रूग्णालयात ३० हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत अपघातग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी थेट रूग्णालयात ३० हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. या योजनेची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी सांगितले. दरम्यान, विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी लक्षवेधी अंतर्गत बाळासाहेब ठाकरे योजनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील कोणत्याही रस्त्यावर अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेतंगॅत ७२ तास मोफत औषधोपचार, तातडीने उपचार मिळावा यासाठी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत ही योजना २०१५ मध्ये सुरु करण्यात आली. मात्र, या योजनेचा अपघातग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही. दोन वर्षापासून बाळासाहेब ठाकरे योजना कागदावर असून अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदत कधी मिळणार, अशी मागणी प्रसाद लाड यांनी लक्षवेधी अंतर्गत केली.

राज्यात दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे योजनेतंर्गत अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदत कधी मिळणार, असा प्रश्न विधान परिषदेचे सदस्य सुधीर तांबे लाड यांच्या लक्षवेधी अंतर्गत उपस्थित केला होता. राज्यात वर्षाला ५५ जण अपघातग्रस्त होतात.अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी महात्मा फुले, आयुष्यमान व बाळासाहेब ठाकरे या तीन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही योजनांच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच या योजनेंतर्गत अपघातग्रस्त किती जखमी ही बाब लक्षात घेत जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येईल, असे सावंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -