घरताज्या घडामोडी'लेखकाचं स्वातंत्र्य, मग प्रकाशन भाजप कार्यालयात कसं?' काँग्रेसचा सवाल!

‘लेखकाचं स्वातंत्र्य, मग प्रकाशन भाजप कार्यालयात कसं?’ काँग्रेसचा सवाल!

Subscribe

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता सरकारी पातळीवर पोहोचला असून 'हे पुस्तक मागे घेतलं जावं आणि भाजपने देशाची माफी मागावी' अशी मागणी राज्यातील सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

‘आज के शिवाजी’, या पुस्तकावरून प्रामुख्याने महाराष्ट्रात काही घटकांकडून संतप्त भावना व्यक्त केली जात असताना आता त्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडीतील एक मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने यावर तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे. राज्याचे महसूल मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ‘देशात जातीभेजाचं, विभाजनाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मोदींना शिवाजी महाराजांशी जोडणं याचा निषेध आम्ही करत आहोत. देश सध्या आर्थिक संकटांमधून जात आहे, इतर अनेक संकटं आहेत. देशातल्या सुराज्यातली परिस्थिती कठीण करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी कशी होऊ शकते?’ असा सवाल थोरात यांनी केला आहे.

हे तर मोदींच्या प्रतिमेचं उदात्तीकरण!

दरम्यान, यावेळी थोरात यांनी ‘पुस्तकात भूमिका मांडणं हे लेखकाचं स्वातंत्र्य आहे’, या मुद्द्यावर कठोर टीका केली. ‘हे पुस्तक मागे घेतलंच पाहिजे. पण भाजपने सगळ्या देशाची माफी देखील मागितली पाहिजे. या मुद्द्यावर कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या गोष्टीचा निषेध करत आहेत. आम्हीही रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध करत आहोत. जर लेखकाचं स्वातंत्र्य असेल, तर त्याचं प्रकाशन भाजपच्या कार्यालयात का करण्यात आलं? मोदींच्या प्रतिमेचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून तो आम्ही सहन करणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाहीत; लेखकाची ताठर भूमिका


..अन्यथा सरकार पुस्तकावर बंदी घालेल – नवाब मलिक

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ‘त्या पुस्तकावर बंदी घालावी अन्यथा राज्य सरकार त्या पुस्तकावर बंदी घालेल’ अशी प्रतिक्रिया दिली. तसेच नरेंद्र मोदींवर टीका होऊ लागल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘जाणता राजा’ असं का करता? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना नवाब मलिक यांनी ‘पवार साहेबांना जनताच जाणता राजा म्हणते, आम्ही कुठेही जाणता राजा असं लिहीत नाही. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोपात तथ्य नाही’, असं सांगत भाजपवर नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -