घरताज्या घडामोडीअशाप्रकारची वक्तव्य खपवून घेणार नाही; संजय राऊत यांना इशारा

अशाप्रकारची वक्तव्य खपवून घेणार नाही; संजय राऊत यांना इशारा

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान करीम लालाला भेटण्यासाठी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी येत असतं हे वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. त्यामुळे राऊत यांनी गुरुवारी वक्तव्य मागे घ्यावं लागलं. याचं पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यापुढे कोणाकडूनही अशाप्रकारची वक्तव्य खपवून घेणार नाही असं सांगितलं आहे. तसंच त्यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

काय ट्विट केलं?

ते म्हणाले की, ‘भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतलं आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.’

- Advertisement -

 

- Advertisement -

‘स्व. इंदिराजी गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केलं. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. ज्या करीम लालाबद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या’, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

थोरात यांनी फडणवीसांवर साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादवसारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवरायांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

'संजय राऊतांचे विधान चुकीचे, अशी विधानं सहन करणार नाही'

'संजय राऊतांचे विधान चुकीचे, अशी विधानं सहन करणार नाही'

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜನವರಿ 16, 2020


हेही वाचा – इंदिरा गांधी – करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे; संजय राऊत यांची माघार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -