बालभारतीच्या अभ्यासक्रमातील बदल पाहून कपिल पाटील भडकले, म्हणाले…

पालक वर्गांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

Maharashtra
kapil patin
कपिल पाटील

लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणाच्या धोरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. बालभारतीने संख्यावाचनात नवीन पद्धत आणल्याने अनेकजण संतप्त अशी प्रतिक्रिया देत आहेत. तसेच पालकांनी मुलांचा अभ्यास कोणत्या पद्धतीने बघायचा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बालभारतीने इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात मोठा बदल केला आहे. इयत्ता दुसरीमध्ये शिकणारे मुले अगदी लहान असतात, त्यांना जोड अक्षरे वाचताना अडचणी येतात.यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या पुस्तकात नवी आणि जुनी दोन्ही स्वरुपात मांडणी करण्यात आली आहे. मात्र, शिक्षकांनी नवीनच पद्धत वापरावी, अशा सुचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.

काय म्हणाले कपिल पाटील?

नवीन शिक्षण पद्धतीच्या धोरणावरुन कपिल पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टिका केली आहे. ” बालभारतीच्या पुस्तकात केलेल्या बदलसंदर्भात मी तज्ज्ञांचा सल्ला घेतला, जेव्हा मी ही गोष्ट शिक्षण तज्ज्ञांना सांगितली तेव्हा तेसुद्धा भडकले. शिक्षणाचा विनोद झाला आहे. मराठी मारण्याचा सरकारचा डाव आहे, बालभारतीची नवीन पुस्तकं फेकून द्या.” अशा भावना कपिल पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोणता बदल झाला आहे?

लहान मुलांना सोपे जावे यासाठी शिक्षण मंडळाने नवीन पद्दत आमलात आणली आहे. अता बत्तीस ऐवजी तीन दोन असे म्हणायचे, एकवीस ऐवजी वीस एक म्हणायचे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here