आंतरजातीय विवाहातून जन्मदात्या आईनेच केली मुलीची हत्या

मंगळवारी सकाळी ऋतूजा आणि तिच्या आईमध्ये भांडण झाले त्यानंतर आईनेच मुलीच्या डोक्यात दगड घातला. आरोपी आईला बारामती शहर पोलिसांनी अटक केली.

Baramati
murder of a person in Santa Cruz
हत्या

जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरामध्ये घडली आहे. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात ही घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे आईनेच आपल्या मुलीचे जीवन संपवले आहे. काही दिवसांपुर्वी मुलीने आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता. यावरुन तिची आई आणि तिच्यामध्ये सतत वाद होत होते. मंगळवारी दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर संतप्त झालेल्या आईने मुलीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिची हत्या केली. हत्येनंतर मुलीची आई बारामती पोलीस ठाण्यात हजर होऊन तिने हत्येची कबूली दिली.

अशी घडली घटना 

ऋतूजा हरीदास बोभाटे (वय १९) असे हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. संजीवनी बोभाटे असं आरोपी आईचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ऋतूजा आणि तिच्या आईमध्ये भांडण झाले त्यानंतर आईनेच मुलीच्या डोक्यात दगड घातला. ही घटना प्रगतीनगर परीसरातील तरुणीच्या आईच्या घरात घडली. मुलीचं प्रेम प्रकरण असल्यानं खून केल्याची कबुली संजीवनी हिने दिली. खूनानंतर संजीवनी बोभाटे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होऊन तिने हत्येची कबूली दिली.

पोलिसांनी महिलेला केली अटक

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा बारामती शहरातील महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिकत होती. तिचे बारामती शहरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ऋतुजाच्या या प्रेमाला तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. मात्र ऋतुजाने आई-वडिलांना डावलून त्या तरुणाशी पळून जाऊन लग्न केले. यामुळे तिचे आई-वडील संतप्त झाले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात तिच्या नवऱ्याने तिला नांदवण्यास नकार दिला. यावरुन तिची आई आणि ऋतुजामध्ये सतत भांडण होत होते. मंगळवारी असेच भांडण झाले आणि या भांडणानंतर तिच्या आईने तिची हत्या केली.

हेही वाचा – 

बीडमध्येही ‘सैराट’