घरCORONA UPDATEबेस्ट, एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच मिळणार?

बेस्ट, एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच मिळणार?

Subscribe

महाराष्ट्र शासनाने शुक्रवारी 'कोविड योद्ध्यांना' ५० लाखांच्या वैयक्तिक विमा सुरक्षा कवच देऊ केले आहे.

महाराष्ट्र शासनाने शुक्रवारी ‘कोविड योद्ध्यांना’ ५० लाखांच्या वैयक्तिक विमा सुरक्षा कवच देऊ केले आहे. यामध्ये बेस्ट आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांदेखील समावेश होणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात अत्यावश्यक सेवा देणारे सरकारी कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडले तर त्यांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई  देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

यामध्ये राज्य सरकारने अगदी कंत्राटीपासून ते सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना सामावुन घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय सार्वजनिक उपक्रमाचे कमर्चारी यात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे बेस्ट आणि एसटी कामगारांनाही हा कायदा लागू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसटी महामंडळाचे एक लाख पाच हजार तर बेस्टचे ४२ हजारांहून अधिक कामगारांना हा कायदा लागू होणार आहे. शुक्रवारी शासनाने काढलेल्या अध्यादेशात एसटी बेस्टच्या कर्मचाऱ्यांबाबत स्पष्टपणे उल्लेख केला नव्हता. परंतु कोविड-१९ अत्यावश्यक सेवा घटकांसाठी हा कायदा लागू होत असल्याने आणि बेस्ट अत्यावश्यक सेवा पुरवित असल्याने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना हा कायदा लागू झाला असल्याचे बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -