घरमहाराष्ट्रपोलीस भरती विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पोलीस भरती विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Subscribe

पोलीस भरती संदर्भात शासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या जीआर विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापुरात निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने पोलीस भरतीच्या संदर्भात काढण्यात आलेला जीआर हा तरुणांवर अन्याय करणारा असून या शासन निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापुरात निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाच्यावतीने काढण्यात आलेला जीआर हा तरुणांवर अन्याय करणारा असून पोलीस दल सक्षम होण्याऐवजी दुबळे होण्याची भीती व्यक्त करत, हे आंदोलन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात करण्यात येणाऱ्या पोलीस भरतीच्या संदर्भात राज्य शासनाने १८ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णय घेऊन पोलीस भरतीचे निकष बदलले आहेत

काय आहे नवीन जीआर..?

नवीन नियमात बदल करत असताना अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी चाचणी, असा निर्णय घेऊन मैदानी चाचणी देखील १०० मार्क वरून ५० मार्कांची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या वेळेस सरकारने भरती प्रक्रियेत केलेला हा बदल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांवर आणि ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -